पूर्वीच्या काळात धर्म आणि जात-पात यांच्यामुळे समाजात खूप भेदभाव निर्माण व्हायचे. समाजातील लोक त्यांच्या जातीनूसार आणि धर्मानूसार लोकांना वागणूक द्यायचे. अशातच जर एखाद्या तृतीयपंथी बाळाने जर एखाद्या घरात जन्म घेतला तर त्या घरातील लोक आणि समाज त्याला स्वीकार करण्यास नकार देऊन त्याला वाळीत टाकण्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत.
तृतीयपंथीकडे लोक व्यक्तींकडे एक वेगळ्या नजरेने आणि भावनेने बघतात. पण आज हेच तृतीयपंथी लोक इतक्या मोठ्या पदावर जाऊन बसले आहे याचा तुम्ही विचारही करू शकत नाही. पण काही तृतीयपंथी लोकांना आपल्या जीवनात इतका त्रास सहन करावा लागला आहे कि, याचा तुम्ही विचार पण केला नसेल. तृतीयपंथीचे आयुष्य नेमक कसे असेल? ते इतर नागरिकांसारखे का नसतात? त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी उघड का नसतात? त्याच्या काही गोष्टी लपवल्या जातात की गोपनीय ठेवली जातात? त्यांच्या संबंधीत अनेक गोष्टी या आपल्याला माहितच नसतात. अशाच एका तृतीयपंथीने तरुण वयातील व्यस्था सांगितली आहे, ती ऐकून डोळे पाणावतील.
तृतीयपंथी पायल यूपीमधील उन्नावमधील बहरामऊ गावची ती रहिवासी आहे. तिच्या आईवडिलांना तीन मुले होती आणि त्यामध्ये पायल हि तिसऱ्या क्रमांकावर होती. पायलचे वडील नेहमी खूप रागात असायचे. यामागील कारण म्हणजे आजूबाजूचे लोक त्यांना तृतीयपंथीचा बाप म्हणून कायम त्रास देत होते. यामुळे अनेकवेळा पायलला वडिलांनी मारहाण देखील केली. वडिलांनी मला साथ दिली नाही पण, आईने नेहमी मला पाठिंबा दिला, असं पायलने सांगितले.
पायलने शाळेत घडलेला एक प्रसंग देखील सांगितला. शाळेतील शिक्षक देखील मला जबरदस्ती नृत्य करायला सांगायचे. सर तुम्ही मला शिकवणार कधी?, असा प्रश्न विचारल्यास हेच तुझे शिक्षण आहे, असं शिक्षकांकडून उत्तर यायचे, असं पायलने सांगितले. या सर्व गोष्टींचा कंटाळा आल्याने तिने शिक्षण त्याग करण्याचा निर्णय घेतला. तसेच माझ्या आयुष्यात आलेलं संकट आणखी कुणाल्या आयुष्यात येऊ नये, अशी प्रार्थना देखील पायलने दिलेल्या मुलाखतीत केली. त्याचप्रमाणे तुमच्या आजूबाजूला जर असे तृतीयपंथी असतील तर, त्यांना मदत करा आणि मार्गदर्शन करा, ज्यामुळे त्यांनाही एकटं वाटणार नाही, असं आवाहन पायलने केलं.