- हरिश गुप्तानवी दिल्ली - सीबीआय व ईडीच्या तपासातून कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध माहिती बाहेर येत आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिकाधिक पुरावे मिळत असल्याचा दावा तपास यंत्रणा करीत आहेत. फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाने (एफआयपीबी) घेतलेल्या निर्णयाचा फायदा केवळ आयएनएक्स मीडिया या कंपनीलाच झाला नव्हे, तर कार्ती यांचा सल्ला घेणा-या ९ कंपन्यांना याचा फायदा झाल्याचे यंत्रणांचे म्हणणे आहे.तथापि, या प्रकरणी ईडीकडून भविष्यात पी. चिदंबरम यांची चौकशी होऊ शकते. या निर्णयात त्यांचे चिरंजीवही लाभार्थी आहेत. एका अधिकाºयाने सांगितले की, ज्या कंपन्यांना आधी एफआयपीबीकडून समस्यांचा सामना करावा लागला, त्यांनाच कार्ती यांच्याशी व्यवहारानंतर दिलासा मिळाला होता. कार्ती यांच्याशी व्यवहारानंतर किंवा त्यांची सेवा घेतल्यानंतर एफआयपीबीने त्या कंपन्यांच्या बाजूने निर्णय घेतल्याचे कळते. पी. चिदंबरम अर्थमंत्री असताना कार्ती यांचे या कंपन्यांशी संबंध आल्याची कागदपत्रे एजन्सीला मिळाल्याची चर्चा आहे.
कार्तींनी घेतले ९ कंपन्यांकडून पेमेंट, पी. चिदंबरम यांच्या वाढू शकतात अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:27 AM