‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक बलात्कार प्रकरणी दोषी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 01:50 PM2016-07-30T13:50:46+5:302016-07-30T19:20:46+5:30

अमेरिकन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी साकेत न्यायालयाने ‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला दोषी ठरवलं आहे. २ आॅगस्ट रोजी न्यायालय महमूद ...

'Peepli Live' co-director raped in rape case | ‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक बलात्कार प्रकरणी दोषी

‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक बलात्कार प्रकरणी दोषी

googlenewsNext
ेरिकन महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी साकेत न्यायालयाने ‘पिपली लाईव्ह’चा सह-दिग्दर्शक महमूद फारुकीला दोषी ठरवलं आहे. २ आॅगस्ट रोजी न्यायालय महमूद फारुकीला शिक्षा सुनावणार आहे. महमूद फारुकी जामीनावर बाहेर आहे. मात्र न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आलं आहे.  
महमूद फारूकीला २०१५ मध्ये बलात्काराच्या आरोपात अटक करण्यात आली होती. नवी दिल्ली न्यू फ्रेंडस कॉलीनीत पोलीस ठाण्यामध्ये एका अमेरिकन महिलेने महमूद फारूकीविरोधात तक्रार नोंदविली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फारुकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत अटक केली होती. मार्च २०१५ मध्ये फारुकीने बलात्कार केल्याचे पिडीत महिलेने तक्रारीत म्हटले होते. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पिपली लाईव्ह’ या चित्रपटाचे फारुकी याने सह दिग्दर्शन व लेखन केले होते.
 तक्रार केलेली 35 वर्षीय अमेरिकन महिला कोलंबिया विद्यापीठाची विद्यार्थिनी होती. रिसर्चसाठी ती भारतात आली होती. यावेळी महमूद फारूकीने बलात्कार केल्याची तक्रार महिलेने केली होती. न्यायालयातही महिला आपल्या तक्रारीवर ठाम होती. महमूद फारूकीने माफी मागत आपल्याला अनेक ई-मेल्स पाठवले होते अशी माहिती महिलेने न्यायालयात दिली होती. फारुकीने मात्र सर्व आरोप फेटाळत आपल्याला फसवण्यात आल्याचा दावा केला होता.
 दिल्ली पोलिसांनी 29 जून रोजी पहिलं आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यानुसार 28 मार्च रोजी महमूद फारूकीने आपल्या सुखदेव विहारमधील निवासस्थानी महिलेवर बलात्कार केल्याची माहिती दिली होती. महमूद फारूकीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप पोलिसांकडून करण्यात आला होता.

Web Title: 'Peepli Live' co-director raped in rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.