शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक, संजय राऊतांचीही उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 2:57 PM

विरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.

ठळक मुद्देविरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला

नवी दिल्ली - संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून पेगॅससच्या माध्यमातून झालेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. पॅगेससवरून चर्चेची मागणी करत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलं. त्यानंतर, जवळपास डझनभर विरोधी पक्षातील नेत्यांनी संसदेतील चेम्बरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेऊन या विषयावर आणखी मंथन केले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही या बैठकीला उपस्थित होते.  

विरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला. संसदेत सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात जवळपास डझनभर पक्षाच्या नेत्यांचे सहभागी होते. या बैठकीनंतर राहुल गांधींनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. संसदेच्या चेम्बरमध्ये राहुल गांधीसमेवत झालेल्या या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांसह इतरही विरोधी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. संजय राऊत यांनी ट्विटरवरुन या बैठकीचा फोटो शेअर केला आहे. 

राहुल गांधींचे मोदी सरकारला प्रश्न

'संसदेत विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. मोदी सरकारनं पेगॅसस खरेदी केलं की नाही आणि पेगॅसस हत्याराचा वापर आपल्याच लोकांविरुद्ध केला की नाही, या प्रश्नांची उत्तरं सरकारनं द्यावीत,' असं राहुल गांधी म्हणाले. 'माझ्याविरोधात, सर्वोच्च न्यायालयाविरोधात, माध्यमांविरोधात, सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात पेगॅसस हत्याराचा वापर करण्यात आला. सरकारनं हे का केलं, याचं उत्तर त्यांनी द्यावं. आम्ही संसदेचं कामकाज रोखलेलं नाही. आम्ही आमचा आवाज बुलंद केला आहे. ज्या शस्त्राचा वापर दहशतवाद्यांविरोधात करायचा, त्याचा वापर आमच्याविरोधात का केला जात आहे? सरकारनं पेगॅसस का खरेदी केलं?', असे प्रश्न राहुल यांनी उपस्थित केले.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेना