भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ( Dr. Manmohan Singh ) हे प्रसिद्घ अर्थशास्त्रज्ञ आहेत. मनमोहन सिंग हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर पंतप्रधानपदी पाच वर्षपूर्ण झाल्यानंतर पुन्हा विराजमान होणारे पहिले व्यक्ती होते. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्यास व भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे Licence Raj त्यांनी १९९१मध्ये अर्थमंत्री असताना रद्द केले. त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचे उदारीकरण केले आणि विकासाला गती मिळवून दिली.
त्यांनी १९९९ मध्ये BBCला दिलेल्या एका मुलाखतीत गंभीर मुद्दा मांडला होता आणि त्यात त्यांनी Soviet Union सारखा देश कसा नष्ट झाला याचे उदाहरण दिले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन झाल्यामुळे जगाच्या नकाशावरून हा देश नाहीसा झाला आणि भारतातही तसे घडू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. त्यांनी लोकसभेतील सर्व सदस्यांना एक सल्लाही दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गैरव्यवस्थापनानंतर कुणीही हे गृहित धरू नका की ते भारताची भरभराट तुम्ही करू शकता.
''Soviet Union सारखा देश जगाच्या नकाशावरून नाहीसा झाला. जर भारताचे राजकारण व्यवस्थित हाताळले नाही, तर आपणही त्याच धोक्याच्या वळणावर पोहचू,''असे मनमोहन सिंग यांनी म्हटले होते. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ...