जनतेने भाजपाचा अहंकार मोडला, पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 05:36 PM2024-01-08T17:36:15+5:302024-01-08T17:36:44+5:30

Congress Criticize BJP: राजस्थानमधील श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. हा निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले उमेदवार सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा काँग्रेसच्या रूपिंदर सिंह कुन्नूर यांनी पराभव केला आहे.

People broke BJP's ego, Congress said after its victory in the by-elections | जनतेने भाजपाचा अहंकार मोडला, पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने सुनावले

जनतेने भाजपाचा अहंकार मोडला, पोटनिवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने सुनावले

राजस्थानमधील श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. हा निकाल राज्यातील सत्ताधारी भाजपासाठी धक्कादायक ठरला आहे. या पोटनिवडणुकीत भाजपाचे दहा दिवसांपूर्वीच मंत्रिपदाची शपथ घेतलेले उमेदवार सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा काँग्रेसच्या रूपिंदर सिंह कुन्नूर यांनी पराभव केला आहे. या विजयानंतर काँग्रेसमध्ये उत्साह संचारला असून, श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपाचा अहंकार मोडून काढला, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. 

या विजयानंतर सोशल मीडियावर विजयी उमेदवार रूपिंदर सिंह कुन्नूर यांचा फोटो शेअर करत काँग्रेसनेभाजपाला शाब्दिक टोले लगावले आहेत. श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाने सत्तेच्या अहंकारातून निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला मंत्री बनवून आचारसंहितेची खिल्ली उडवली होती. मात्र श्रीकरणपूरच्या जनतेने भाजपाचा हा अहंकार मोडीत काढला आहे. येथून काँग्रेसचे उमेदवार श्री रूपिंदर सिंह कुन्नूर यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या अहंकारी नेत्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की, त्यांनी कुणालाही मंत्री बनवलं तरी शेवटी लोकप्रतिनिधी जनताच बनवते.

श्रीकरणपूर या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुनूर यांचं निधन झाल्याने  येथील निवडणूक रद्द करण्यात आली होती. त्यामुळे राजस्थानमध्ये १९९ जागांसाठीच मतदान झालं होतं. तर श्रीकरणपूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतंच मतदान झालं होतं. त्यात मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराच्या बाजूने कौल दिला आहे.  सुरेंद्र पाल सिंह टीटी यांनी दहा दिवसांपूर्वीच राजस्थान सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तसेच मुख्यमंत्री भजनलाल शर्मा त्यांच्या सरकारमध्ये सुरेंद्र पाल सिंह टीटी यांना राज्यमंत्रिपद (स्वतंत्र प्रभार) देण्यात आले होते. मात्र आजच्या पराभवामुळे  त्यांचं मंत्रिपद औटघटकेचं ठरलं आहे.   
 

Web Title: People broke BJP's ego, Congress said after its victory in the by-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.