नितीन अग्रवाल नवी दिल्ली : धान्य उघड्यावर सडू देण्याऐवजी ते जर गरजूंना मोफत वाटले तर त्यातून त्यांचे पोट तरी भरेल, असे एकदा सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या या भूमिकेवर सरकार आता कार्यवाही करताना दिसत आहे. सरकारने राज्यांना स्वस्त धान्य दुकानांवरील लाभार्थींना तीन महिन्यांचा गहू एकदमच द्यावा, असे म्हटले. यामुळे गहू साठवण्याचा प्रश्नही सुटेल आणि पावसात तो सडण्याचेही टळेल.केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना म्हटले की, पावसाळ््यामुळे सगळ््या राज्यांनी त्यांनी खरेदी केलेला गहू गोदामात पोहोचवावा, असे आदेश दिले गेले आहेत. याशिवाय राज्यांना हे सांगितले जात आहे की, त्यांनी नियमानुसार येत्या तीन महिन्यांचा गहू ग्राहकाला एकदमच द्यावा. या निर्णयामुळे राज्याच्या एकूण खपाचा चौथा भाग लोकांच्या घरी पोहोचेल व पावसात भिजण्याचीही भीती राहणार नाही.
लोकांना एकाच वेळी मिळेल ३ महिन्यांचा गहू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 5:20 AM