काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनीलकुमार जाखड हे अबोहर मतदारसंघातून भाजपाच्या अरुण नारनाग यांच्याकडून पराभूत झाले आहेत. सुनीलकुमार हे दिवंगत नेते बलराम जाखड यांचे चिरंजीव आहेत. पक्षाचे अन्य एक मोठे नेते मोहिंदर सिंग केपी आदमपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. त्यांना अकाली दलाच्या पवनकुमार टीनू यांनी पराभूत केले. काँग्रेसचेच केवल ढिल्लन आपल्या पारंपरिक बरनाला मतदारसंघातून गुरमीत सिंग मीत यांच्याकडून पराभूत झाले आहेत. गायक ते नेते असा प्रवास करणारे काँग्रेसचे मोहम्मद सादिक जैतू मतदारसंघातून बलदेव सिंग यांच्याकडून पराभूत झाले. पराभूत झालेल्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये जगमोहन सिंग कांग यांचा समावेश आहे. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग हे लाम्बी मतदारसंघातून मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना पराभूत करण्यात अपयशी ठरले आहेत. लाम्बी हा बादल कुटुंबाचा गढ समजला जातो. मात्र दुसऱ्या ठिकाणी अमरिंदर सिंग विजयी झाले. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल लेहरागग्गा मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. तर, काँग्रेसचे उमेदवार करण कौर, अजित इंदर सिंग हेही पराभूत झाले आहेत. अकाली दलाच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यात अनेक कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे. कॅबिनेट मंत्री गुलजार सिंग, तोता सिंग, जनमेजा सिंग, आदेश प्रताप सिंग, सिकंदर सिंग मालुका, सुरजीत सिंग रखडा, सोहन सिंग ठंडल यांचा पराभूत उमेदवारांत समावेश आहे. अकाली दलाच्या अन्य पराभूत नेत्यांमध्ये युवराज भूपिंदर सिंग, सुचा सिंग लंंघाह, रविंदर सिंग ब्रह्मपुरा, विरसा सिंग, अजित सिंग शांत, सेवा सिंग आणि उपिंदरजीत कौर यांचा समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जनतेने अकाली, भाजपाला नाकारले
By admin | Published: March 12, 2017 12:58 AM