शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मोदीजी १५ लाख देत असल्याचा मेसेज आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 14:34 IST

पोस्टल खातं असणाऱ्यांना मिळणार १५ लाख रुपये

इडुक्की: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आले असले तरीही त्यांनी ५ वर्षांपूर्वी दिलेलं १५ लाखांचं आश्वासन आजही अनेकांच्या लक्षात आहे. आजही विरोधक यावरुन मोदींना लक्ष्य करतात. तर भाजपा अध्यक्ष अमित शहांनी काही महिन्यांपूर्वीच १५ लाख म्हणजे केवळ जुमला असल्याचं म्हटलं होतं. मात्र आजही अनेकांना १५ लाख मिळतील, असा विश्वास वाटतो. केरळच्या मुन्नार भागातील पोस्ट कर्मचाऱ्यांना नुकताच याचा अनुभव आला. मोदीजी १५ लाख देत असल्याचा मेसेज मुन्नारमधील अनेकांना आला. व्हॉट्स अ‍ॅपवर आलेला हा मेसेज अनेकांना खरा वाटला. पोस्टल अकाऊंट असणाऱ्यांना मोदी सरकारकडून १५ लाखांपर्यंतचे आर्थिक लाभ मिळणार असल्याचा मेसेज प्रचंड व्हायरल झाला. शनिवारी संध्याकाळी अनेकांना व्हॉट्स अ‍ॅपवर मेसेज मिळाल्यानंतर रविवारी मुन्नारच्या पोस्ट ऑफिसबाहेर रांग लागली. हा प्रकार लक्षात येताच पोस्ट कर्मचाऱ्यांनी व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झालेला मेसेज खोटा असल्याचं रांगेतील अनेकांना सांगितलं. पोस्ट ऑफिसच्या आवारात तसे फलकदेखील लावण्यात आले. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. १५ लाख मिळणार म्हणून अनेक मजुरांनी सुट्टी घेतली. मिळेल त्या वाहनातून मजूर मोठ्या संख्येनं मुन्नार पोस्ट ऑफिसबाहेरील रांगेत उभे राहिले. पोस्टल खात्यांची संख्या वाढवण्याचे आदेश सरकारनं दिल्यामुळे पोस्ट ऑफिस सुरूच होतं. पोस्ट कर्मचाऱ्यांनी दिवसभर मजुरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही रात्री ८ पर्यंत पोस्ट ऑफिसबाहेर मजुरांची गर्दी होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोस्ट कर्मचाऱ्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. १५ लाखांची अफवा पसरल्यापासून अवघ्या ३ दिवसांमध्ये मुन्नार पोस्ट ऑफिसमध्ये दीड हजार पोस्टल खाती उघडली गेली आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPost Officeपोस्ट ऑफिस