लखनऊ, दि. 30 - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. योगी आदित्यनाथ बोलले आहेत की, 'असं होऊ नये की मुलं दोन वर्षाची झाल्यानंतर पालकांनी त्यांना सरकारच्या भरवशावर सोडून द्यावं. सरकारने त्यांचा सांभाळ करावा असं त्यांना वाटू नये'. योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरचा उल्लेख केला नसला तरी अनेकांनी नेमकं यातून योगी आदित्यनाथांना काय म्हणायचं आहे असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी बोलताना योगी आदित्यनाथ यांनी प्रसारमाध्यमांवरही टीका केली. 'इकडे कचरा पडला आहे, तिकडे कचरा पडला आहे असं प्रसारमाध्यमं नेहमी सांगत असतात. ही सरकारची जबाबदारी आहे हे आम्हाला मान्य आहे. असं वाटत सगळ्या जबाबदा-यांतून मुक्त झालो आहोत', असं योगी आदित्यनाथ बोलले आहेत.
स्टार्टअप यात्रा कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ बोलले आहेत की, 'आम्ही शिक्षणाला फक्त अक्षर ज्ञानापुरतं मर्यादित ठेवलेलं नाही. असं केल्यास रोजगाराची समस्या उभी राहणार नाही. आम्ही SIDBI सोबत मिळून एक हजार कोटींचा स्टार्टअप फंडची सुरुवात करत आहोत. यामुळे तरुणांना मदत मिळेल'. यावेळी बोलताना त्यांनी मान्य केलं आहे, असे अनेक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत सरकारी योजनांची माहिती पोहचत नाही.
गोरखपूरमधील बाबा राघवदास मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील मृतांची संख्या १0५ वर गेली असली तरी उत्तर प्रदेश सरकार त्याकडे फारशा गंभीरपणे पाहताना दिसत नसल्याचे जाणवत आहे. ऑगस्टरच्या दुस-या आठवड्यात ३0 बालकांचे मृत्यू झाल्यावर असे घडले नाही, असे सरकार सांगत होते. नंतर आकडा ७ आहे, असे मान्य केले. नंतर संख्या ६३ वरून वाढत गेली आणि आता ती १0५ झाली.
हॉस्पिटलमधील बालमृत्यूवरून राज्यात राजकारण सुरू झालं होतं. विरोधकांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व आरोग्यमंत्र्यांची राजीनाम्याची मागणी केल्यानंतर, हे आधीच्या सरकारचे पाप आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी अखिलेश यादव सरकारवर ढकलण्याचा प्रयत्न केला होता. समाजवादी पक्षाने मात्र नव्या सरकारच्या भ्रष्ट व गैरकारभाराचा हा नमुना असल्याचा आरोप केला होता.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गोरखपूरमध्ये जाऊन चार मृत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आदित्यनाथ हेही गोरखपूरला आले आणि त्यांनी हातात झाडू घेऊ न, परिसर स्वच्छ करतानाची छायाचित्रे काढून घेतली होती. त्यानंतर गोरखपूरला पिकनिक स्पॉट बनवण्याची परवानगी युवराजांना दिली जाणार नाही, असे विधान राहुल गांधी यांना उद्देशून केले होते.
आपल्यासोबत कोणीही डॉक्टर अथवा अॅम्बुलन्स नकोय, असे राहुल यांनी दौºयाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. डॉक्टरांची गरज मेंदूज्वराच्या रुग्णांना आहे, असेही ते म्हणाले होते.