वायनाड : केरळमधील भूस्खलनाची दुर्घटना होऊन आठवडा लोटला, तरी शेकडो लोकांचा बळी घेणाऱ्या या दुर्घटनेच्या आठवणी अद्याप बचावकार्यात सहभागी कर्मचारी व अधिकाऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. लोक डोळ्यासमोर पूर व गाळात वाहून जात होते. मात्र, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी काहीही करू शकलो नाही, अशा वेदना बचाव अभियानादरम्यान आलेल्या संकटाची आपबिती सांगताना वायनाडच्या मेप्पाडी पोलिस ठाण्याच्या एका पोलिस अधिकाऱ्याने व्यक्त केली.
नेमके काय घडले?- भूस्खलन झाल्याचे समजल्याबरोबर जिबलू रहमान घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा वाचविलेल्या एका व्यक्तीचे हात व पाय तुटलेले दिसले. जखमी लोक मदतीसाठी आक्रोश करत होते. - अत्यंत वेगाने पाणी खाली येत होते. या पाण्यासोबत चिखल, दगड व झाडे आणि सोबत लोक वाहून जात असल्याचे पाहून अंगावर काटा आला. ते गाळासोबत वाहून जात असताना मी काहीही करू शकलो नाही, अशा भावना रहमान यांनी व्यक्त केल्या.