नवी दिल्ली : ईव्हीएममधून मिळणारी झालेल्या मतदानाची आकडेवारी संगतवार लावण्यात वेळ लागल्याने मतदानाची नेमकी आकडेवारी जाहीर करण्यात उशीर झाल्याचा दावा दिल्ली निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान शनिवारी पार पडले. परंतु मतदान उलटल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झालेल्या एकूण मतदानाची नेमकी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर न केल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती. केजरीवाल यांनी आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीवरही ताशेरे ओढले होते. आम आदमी पक्षाचे नेतेही आयोगावर टीका करीत होते. सोशल मीडियातूनही आपच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केल्याने निवडणूक आयोगाने रविवारी रात्री घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन मतदानाची नेमकी टक्केवारी जाहीर केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत यावेळी एकूण ६२.५९ टक्केमतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. सर्वाधिक ७१.६ टक्के मतदान बल्लीमारन या मतदारसंघात तर सर्वात कमी ४५.४ टक्के मतदान दिल्ली कॅन्टॉन्मेंट मतदारसंघात झाल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये एकूण ६०.५ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत दोन टक्के अधिक मतदान झाले तर, गेल्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत ६७ टक्के मतदान झाले होते. मागील निवडणुकीच्या तुलनेत या खेपेला पाच टक्के कमी मतदान झाल्याचे आयोगाने स्पष्ट केले.दिल्लीत भाजपचेच सरकार; एक्झिट पोल चुकीचेमतदानानंतरच्या चाचण्यांनी दिल्लीत आम आदमी पक्षाला सत्ता मिळणार असल्याचे सांगितले असले तरी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी चाचण्यांचे हे निकाल चुकीचे असल्याचे सांगत दिल्लीत भाजपच सरकार स्थापन करणार असा दावा केला आहे. जावडेकर म्हणाले की, भाजपला खºया निकालाची प्रतीक्षा आहे. मतदानोत्तर चाचण्या आणि अंतिम निकाल यांच्यात मोठा फरक असेल. लोकसभा निवडणुकीत मतदानोत्तर चाचण्यांचे केलेले भाकीत खोटे ठरले होते.