शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीला पूर्णविराम

By admin | Published: June 03, 2016 2:56 AM

पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या बैठकीत उघडपणे दोन तट पडणार, हे दिसतच होते.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधल्या पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या बैठकीत उघडपणे दोन तट पडणार, हे दिसतच होते. पश्चिम बंगालमधील पराभव आणि केरळमधील विजय यामुळे ते अधिकच रुंद झाले. केरळमधील पक्षाच्या नेत्यांनी बंगालमध्ये काँग्रेसशी आघाडी केल्याबद्दल महासचिव सीताराम येचुरी यांना धारेवरच धरले. त्यामुळे भविष्यात काँग्रेसशी कोणतीही तडजोड अथवा निवडणूकपूर्व आघाडी नको, या भूमिकेवर पॉलिटब्युरोने शिक्कामोर्तब केले. केरळस्थित करातसमर्थक सदस्यांनी पॉलिटब्युरोच्या बैठकीत महासचिव सीताराम येचुरींवर कठोर टीका करीत नाराजीचा सूर नोंदवला. केरळमधे डाव्या आघाडीचा विजय आणि पश्चिम बंगालच्या पराभवानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिटब्युरोची दिल्लीत बैठक झाली. काँग्रेसशी निवडणूकपूर्व आघाडी करू नये, असे स्पष्ट मत फेब्रुवारीत निश्चित केल्यानंतरही प. बंगालच्या निवडणुकीला काँग्रेसबरोबर सामोरे जाण्याचा निर्णय का घेतला? केंद्रीय समितीच्या निर्णयाचे उल्लंघन का झाले, असा सवाल करत पॉलिटब्युरोच्या काही सदस्यांनी सीताराम येचुरींवरच हल्ला चढवला. एक सदस्य म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्टांनी देशात काँग्रेस अथवा भाजपाशी यापूर्वी कधीही आघाडी करून निवडणूक लढवली नाही, कारण हे दोन्ही पक्ष मूलत: सत्ताधारी प्रवृत्तीचे आहेत. जनआंदोलने वा लोकांच्या दैनंदिन समस्यांकडे पाहण्याचा डाव्या पक्षांच्या तुलनेत या दोन्ही पक्षांचा दृष्टिकोन भिन्न आहे. पर्यायच शोधायचा झाला तर समविचारी पक्षांशी सहकार्य करीत निवडणूक लढवणे, हीच माकपची नेहमीची भूमिका आहे. (विशेष प्रतिनिधी)...तर अनेक संकटे उभी राहिली असती - येचुरी१पॉलिटब्युरोच्या बैठकीत संतप्त सदस्यांना शांत करताना येचुरी म्हणाले की, पक्षाच्या प. बंगाल समितीने काँग्रेसशी आघाडी करून राज्यात निवडणूक लढवण्याची भूमिका बरीच आधी ठरवली होती. स्थानिक काडरने त्या दिशेने पूर्वीपासून तयारी चालवली होती. केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार, राज्य समितीला ऐनवेळी तो निर्णय बदलण्यास भाग पाडले असते, तर अनेक संकटे उभी राहिली असती. अखेर गप्प राहून समितीच्या निर्णयाला दुजोरा देणेच उचित ठरणार होते.२येचुरींचा खुलासा पॉलिटब्युरोतल्या केरळच्या सदस्यांच्या काही फारसा गळी उतरला नाही. बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या पत्रकात पक्षाने म्हटले की प. बंगालमधे निवडणुकीची रणनीती केंद्रीय समितीच्या भूमिकेशी सुसंगत नव्हती.