खंडणीसाठी गरीब महिलेचा छळ
By admin | Published: August 29, 2015 12:20 AM
नागपूर : झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका गरीब महिलेला वाडीतील कुख्यात गुंडांनी खंडणीसाठी वेठीस धरले आहे. प्रकाश बमनोटे (रा. द्रुगधामना) आणि दादू लांजेवार (रा. गणेशनगर झोपडपट्टी, आठवा मैल) अशी आरोपींची नावे आहेत. दीपाली धनराज दिघोरे (३२) ही गरीब महिला गणेशनगर, आठवा मैल येथील झोपडपट्टीत राहते. या परिसरात कुख्यात बमनोटे आणि लांजेवार ...
नागपूर : झोपडपट्टीत राहाणाऱ्या एका गरीब महिलेला वाडीतील कुख्यात गुंडांनी खंडणीसाठी वेठीस धरले आहे. प्रकाश बमनोटे (रा. द्रुगधामना) आणि दादू लांजेवार (रा. गणेशनगर झोपडपट्टी, आठवा मैल) अशी आरोपींची नावे आहेत. दीपाली धनराज दिघोरे (३२) ही गरीब महिला गणेशनगर, आठवा मैल येथील झोपडपट्टीत राहते. या परिसरात कुख्यात बमनोटे आणि लांजेवार खंडणी वसूल करतात. या दोघांनी दिघोरेलाही येथे झोपडी बांधून राहाण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम मोठी असल्याने तिला एकमुस्त देणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रतिमाह पाच हजार रुपये प्रमाणे हप्ता देण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी सदर महिलेने प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे दोनदा गुंडांना १० हजार रुपये दिले. मात्र, आता ही रक्कम देणे शक्य नसल्यामुळे आरोपी तिला छळू लागले. त्यांचा त्रास वाढल्यामुळे शेवटी तिने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. वाडी पोलिसांनी आरोपी बमनोटे आणि लांजेवारविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ---हवाला प्रकरणाचा तपास प्राप्तिकर खात्याकडेनागपूर : गुन्हेशाखेच्या पथकाने जप्त केलेल्या कथित हवाला प्रकरणाचा तपास प्राप्तिकर खात्याला हस्तांतरित करण्यात आला आहे. विकास जाधव आणि मनीष चावरे या दोन तरुणांना गुन्हेशाखेच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले होते. त्यांच्याकडून ५० लाख रुपये जप्त करण्यात आले होते. ही रक्कम हवालाचीच आहे, अशी जोरदार चर्चा होती. ज्या संस्थेत विकास आणि मनीष काम करतात, त्या वित्तीय संस्थेच्या अधिकाऱ्यांची शुक्रवारी गुन्हेशाखेच्या पथकाने चौकशी केली. त्यानंतर हे प्रकरण प्राप्तिकर खात्याकडे सोपविण्यात आले.---