हैदराबाद: सोशल मीडियावर प्राणिसंग्रहालयातील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओमध्ये पिंजऱ्यात आलेल्या व्यक्तींवर प्राण्यांनी हल्ला केल्याचे व्हिडिओही असतात. असाच काहीसा प्रकार हैदराबादमधील नेहरू प्राणिसंग्रहालयात घडला आहे. या प्राणी संग्रहालयात आफ्रिकन सिंह आहेत, एक व्यक्ती त्या सिंहाच्या पिंजऱ्यात घुसला. पण, सुदैवाने त्याला काही झाले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू प्राणिसंग्रहालयात सिंहांना पिंजऱ्याऐवजी खुल्या जागेत ठेवले जाते. एक व्यक्ती अचानक त्या सिंहांच्या आवारात घुसला. त्या व्यक्तीला पाहून सिंहाने त्याच्यावर हल्ला करण्याची पूर्ण तयारी केली होती. पण, सुदैवाने त्या व्यक्तीला काहीच झाले नाही. अखेर प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचार्यांनी त्या माणसाची सुटका केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले.
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, आत एक सिंह उभा आहे आणि तो व्यक्ती दगडांवर बसलेला आहे. सिंह त्या व्यक्तीकडे हल्ला करण्याच्या उद्देशाने बघत आहे, हे दृष्य पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. पण, काही वेळानंतर प्राणिसंग्रहालयाचा एक कर्मचारी येतो आणि त्या व्यक्तीला तेथून घेऊन जातो. जी साई कुमार असे त्या व्यक्तीचे नाव असून, त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.