ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. आयफोनच्या ऐवजी एका ग्राहकाला चक्क दगड मिळाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने Amazon कंपनीकडून स्वत:साठी आयफोन ऑर्डर केला होता. ऑर्डर मिळाल्यानंतर त्याला आनंद झाला. तो अनबॉक्सिंगचा व्हिडीओ बनवू लागला. व्यक्तीला आयफोनऐवजी दगडाचे दोन तुकडे आल्याचं दिसलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती स्वत:साठी आयफोन ऑर्डर करतो. आयफोनची ऑर्डर दिल्यानंतर, फोन येताच तो उत्साहात उघडून पाहतो. पण पाहताच त्या बिचाऱ्याला धक्काच बसला. त्या व्यक्तीला फोनऐवजी दोन दगड मिळतात. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर युजर्स हैराण झाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"