- नितीन अग्रवाल नवी दिल्ली : काँग्रेस महाधिवेशनात अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर भाजपनेही पलटवार केला आहे.संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे की, जो पक्ष रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत राहिला मात्र आज ते स्वत:ला पांडवांसारखे असल्याचे सांगत आहेत. काँग्रेसने हिंदू परंपरांचा अपमान करण्याची संधी कधी सोडली नाही. पण, आज ते त्याचाच उपयोग करु इच्छित आहेत. स्वतंत्र भारतात ज्यांनी आणीबाणी लादली आणि शीख दंगलीसाठी जबाबदार आहेत ते स्वत:ला पांडव म्हणून घेत आहेत.सितारामन म्हणाल्या, राहुल गांधी यांचे वक्तव्य हे निराशेतून आले आहे. काँग्रेस पक्ष एका फॉर्म्युल्याप्रमाणे काम करत राहिला. त्यांनी देशासमोर एकाच कुटुंबाला स्वातंत्र्य सैनिकाप्रमाणे सादर केले. मतांसाठी स्वत:ला धर्मासोबत जोडले. दुसऱ्या वर्गाच्या मतांच्या धु्रवीकरणासाठी हिंदू परंपरांची थट्टा केली.सितारामन म्हणाल्या की, राहुल गांधी यांनी दोन मंदिरांची कथा ऐकवून आज हिंदू परंपरा आणि विश्वास यांची थट्टा केली. त्यांनी पुजाºयांचा उल्लेख काँग्रेसचे पुजारी आणि भाजपचे पुजारी असा केला. निर्मला सितारामन म्हणाल्या की, राहुल गांधी आज शेतकºयांचे कैवारी झाले आहेत. पण, वस्तुस्थिती ही आहे की, २००९ मध्ये शेतकºयांची मते मिळविण्यासाठी त्यांचे कर्ज तर माफ केले गेले. पण, नंतर त्यांना कर्ज देण्यासाठी अयोग्य ठरविण्यात आले. शेतकºयांच्या नावावर दरवर्षी पैसा खर्च करण्यात आला. मात्र, हा पैसा कुठे गेला.सितारामन म्हणाल्या की, भाजप आधार आणि तांत्रिक माध्यमातून लोकांना थेट सबसिडी देत आहे. पण, काँग्रेस तंत्रज्ञानाला विरोध करत आहे.
रामाचे अस्तित्व नाकारणारे स्वत:ला पांडव म्हणत आहेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:01 AM