नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार १९९१ सालच्या एका प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक अर्जामध्ये गुन्ह्याची माहिती न दिल्याने, त्यांना अपात्र ठरवावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात आली असून, या प्रकरणात निवडणूक आयोगाने चार आठवड्यांत स्पष्टीकरण द्यावे, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.नितीशकुमार यांच्यावर १९९१ साली एका हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ही माहिती निवडणूक अर्ज भरताना दिली नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. अॅड. मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका केली आहे. नितीशकुमार यांनी २००४ व २०१२ साली निवडणूक अर्ज भरताना, प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली नाही वा लपविली, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.नितीशकुमार यांनी आपल्या घटनात्मक अधिकारांचा गैरवापर करून, १७ वर्षांनी संबंधित गुन्ह्याची फाइल बंद करण्यास पोलिसांना भाग पाडले, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
नितीश कुमार यांच्याविरोधात याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 1:31 AM