श्रीनगर : मागच्या वर्षी ५ आॅगस्टपासून नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या १६ नेत्यांच्या सुटकेसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आणि खासदार फारुक अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या घटनाबाह्य आणि बेकायदेशीर नजकैदेला आव्हान दिले आहे.जम्मू-काश्मीर राज्याचा विशेष दर्जा केंद्र सरकारने मागच्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी रद्द केला होता, तेव्हापासून या नेत्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पक्षाच्या वतीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी बंदी प्रात्यक्षिकरण याचिका दाखल करून पक्षनेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बेकायदेशीर नजरकैदेला आव्हान दिले आहे.पक्षाचे नेते मोहम्मद सागर, अब्दुल रहीम राठेर, नासिर अस्लम वनी, आगा सयद महमूद, मोहम्मद खलील, इरफान शाह आणि साहमिमा फिरदौस यांची सुटका करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.फारुक अब्दुल्ला आणि उमर अब्दुल्ला यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ शरीक रियाज यांनी याचिका दाखल केली आहे. पक्षाचे प्रवक्ते इम्रान डार यांनी म्हटले की, कोणत्याची प्रशासकीय आदेशाशिवाय नजरकैद करणे बेकायदेशीर असून, मानवी हक्क आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची पायमल्ली होय. कोर्टाकडून आमच्या सहकाºयांना दिलासा मिळेल, अशी आशा आहे.
नजरकैदेतील नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांच्या सुटकेसाठी कोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 5:06 AM