नवी दिल्ली : गंगा व यमुना नद्या स्वच्छ राखण्याचे आदेश द्यावेत, तसेच या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी असलेल्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीवर देखरेख करावी, अशी विनंती करणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. या विषयासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे (एनजीटी) असून, दाद मागा असे न्यायालयाने याचिकादाराला सांगितले.सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकादाराला सांगितले की, नद्यांची स्वच्छता मोहीम आदी गोष्टींबाबत विचार करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे तुम्ही याचिका सादर करा. ही याचिका स्वामी गुरचरण मिश्रा यांनी दाखल केली होती.
हरवलेल्या लोकांबद्दलची याचिका रद्दबातलहरवलेल्या लोकांचा तपशील जनगणनेमध्ये समाविष्ट करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे की, जनगणना हा धोरणात्मक विषय आहे. त्यामुळे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही.