नवी दिल्ली : केंद्र सरकार पेट्रोलिमय मंत्रालयाची संस्था गेलच्या (गॅस अॅथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड) माध्यमातून मुंबई जवळच्या रायगड जिल्ह्यातील उसारमध्ये साडे आठ हजार कोटी रुपयांचा नवा पेट्रोकेमिकल प्लान्ट उभारणार आहे. त्यामुळे येथे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. शिवाय महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीतही वाढ होईल. गेलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक बी. सी. त्रिपाठी यांनी ही माहिती येथे सोमवारी दिली. ते म्हणाले, गेल येत्या पाच वर्षांत देशात ५४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करील.गेलच्या माहितीनुसार ही गुंतवणूक येत्या दोन ते तीन वर्षांत केली जाईल. यासाठी उसारमध्ये सध्याच्या संसाधनाला वाढवले जाईल. गेलनुसार त्याच्याकडून येत्या पाच वर्षांत जवळपास ५४ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक वेगळ््या क्षेत्रात केली जाईल. त्यामुळे जवळपास ३२ हजार कोटी रूपये एकट्या पाईपलाईनमध्ये केली जाईल. यामुळे देशाच्या सगळ््या भागांत गॅस पोहोचवता येईल. विशेषत: हा पैसा ईशान्य आणि पूर्व भारतात गॅस नेटवर्कचे जाळे निर्माण करण्यात वापरला जाईल. बिहार, झारखंड, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील सगळ््या आठ राज्यांत याचा लाभ होईल. याचसोबत जवळपास १२ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक सिटी गॅस योजनेत केली जाईल. यामुळे लोकांच्या स्वयंपाकघरात गॅस पोहोचवता येईल. १० हजार कोटी रूपयांची गुंतवणूक पेट्रोकेमिकल क्षेत्रात केली जाईल. एकट्या उसारमध्ये साडेआठ हजार कोटी रूपयांच्या गुंतवणुकीतून पेट्रोकेमिकलप्लान्ट सुरू केला जाईल.
रायगड जिल्ह्यातील उसारमध्ये सरकार उभारणार साडेआठ हजार कोटींचा पेट्रोकेमिकल प्लान्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 5:09 AM