ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दुस-यांदा घट करण्याच्या निर्णयामुळे महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला थोडा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या किमतीत प्रतीलिटरमागे 80 पैशांची तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 1 रुपया 30 पैशांची घट करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत.