नवी दिल्ली: मागील काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. यात दररोज वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती नवनवीन विक्रम करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून तेलाच्या किरकोळ किमती स्थिर होत्या, पण बुधवारी (20ऑक्टोबर) पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 35-35 पैशांनी वाढवल्या आहेत. आज दिल्लीत पेट्रोल 106 रुपयांवर गेलं आहे तर डिझेल 95 रुपये प्रति लिटरच्या पातळीवर पोहोचलं आहे. याशिवाय, मुंबईतही आज पेट्रोल 35 पैसे आणि डिझेल 37 पैसे प्रति लिटर महाग झालंय, ज्यामुळे पेट्रोल 112 रुपये आणि डिझेल 102.89 रुपये प्रति लिटर झालं आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. मागील सत्रात आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट कच्चे तेल 0.66 टक्क्यांनी वाढून 84.89 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं. तर, तेलाच्या ठोक किमतीतही मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मंगळवारी कच्च्या तेलाची किंमत 43 रुपयांनी वाढून 6,188 रुपये प्रति बॅरल झाली आहे.
प्रमुख शहरांमधील आजचे दर
- दिल्ली: पेट्रोल –₹106.19 प्रति लिटर; डिझेल - ₹94.92 प्रति लिटर
- मुंबई: पेट्रोल – ₹112.12 प्रति लिटर; डिझेल – ₹102.89 प्रति लिटर
- कोलकाता: पेट्रोल – ₹106.77 प्रति लिटर; डिझेल – ₹98.03 प्रति लिटर
- चेन्नई: पेट्रोल –103.31 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹99.26 प्रति लिटर
- बंगळुरू: पेट्रोल –109.89 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹100.75 प्रति लिटर
- भोपाळ: पेट्रोल –114.81 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹104.15 प्रति लिटर
- पटना: पेट्रोल –109.64 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹101.50 प्रति लिटर
- लखनऊ: पेट्रोल –103.18 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹95.37 प्रति लिटर
- चंडीगड: पेट्रोल –102.21 रुपये प्रति लिटर; डिझेल – ₹94.64प्रति लिटर
आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा
तुम्ही एसएमएसद्वारे तुमच्या फोनवरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही इंडियन ऑईल एसएमएस सेवेअंतर्गत मोबाईल नंबर 9224992249 वर एसएमएस पाठवू शकता. तुम्ही- RSP