पणजी : राज्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढले असून त्याबाबतची अधिसूचना वाणिज्य कर खात्याने गुरुवारी रात्री उशिरा जारी केली. पेट्रोल आता लिटरमागे दोन रुपयांनी, तर डिझेल लिटरमागे एक रुपयाने महाग झाले आहे.गोव्यात आता पेट्रोलचे सुधारित दर लिटरमागे ६२ रुपये तर डिझेलचे दर ६२.७८ पैसे असतील. केंद्र सरकारने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच पेट्रोलचे दर लिटरमागे १ रुपये ९ पैशांनी कमी केल्याने गोमंतकीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.१ आॅगस्टपासून राज्यात पेट्रोल व डिझेलचे वाढतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २४ जुलैला विधानसभेत केले होते. नव्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर आता वाणिज्य कर खाते साडेतीन टक्के व डिझेलवर बावीस टक्के मूल्यवर्धित कर आकारत आहे. या दरवाढीमुळे सरकारच्या तिजोरीत दरमहा सात तर वार्षिक सुमारे ८४ कोटी रुपयांचा महसूल जमा होईल. (खास प्रतिनिधी)
गोव्यात पेट्रोल-डिझेल महागले
By admin | Published: August 01, 2014 4:21 AM