नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी प्रति बॅरल 82 डॉलरचा नीचांक गाठल्याच्या पाश्र्वभूमीवर पेट्रोल आणि डिङोल या दोन्ही इंधनाच्या किमतीमध्ये किमान अडीच रुपयांची कपात होण्याचे संकेत मिळत आहेत. तेल कंपन्यांची उद्या, शुक्रवारी दर आढावा बैठक होणार असून त्यात हा निर्णय होईल.
तेल कंपन्यांच्या बैठकीत दरकपात झाल्यास पेट्रोलच्या दरात ऑगस्टपासून सहाव्यांदा दरकपात होईल तर 18 ऑक्टोबर रोजी सरकारी नियंत्रणातून मुक्त झालेल्या डिङोलच्या दरातील गेल्या पाच वर्षातील दुसरी दरकपात ठरेल.
कपातीचे कारण काय?
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे व्यवहार हे फ्युचर मार्केट व पद्धतीने होत असल्याने
आणि गेल्या तीन महिन्यांत कच्च तेलाच्या किमतीत झालेली कपात व अमेरिकी डॉलरच्या तुलनेत स्थिरावलेला रुपया लक्षात घेता दोन्ही इंधनाच्या किमतीत आणखी किमान 3 रुपयांर्पयत दरकपात होण्याचे संकेत मिळत आहेत.