नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. बुधवारी (17 फेब्रुवारी) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले असून देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल महागले आहे. दिल्लीकरांनाही इंधन दरवाढीचे चटके सहन करावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर 25 पैशांनी वाढले आहेत. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 89.54 रुपये आणि 79.95 रुपये मोजावे लागतील.
कोरोनाच्या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला असून सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार आला आहे. याच दरम्यान देशातील एका राज्यात पेट्रोलच्या दराने शंभरीपार केली आहे. राजस्थानमधील एका जिल्ह्याने उच्चांक गाठला आहे. गंगानगर जिल्ह्यात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. पेट्रोलसाठी लोकांना प्रति लीटर 100.07 रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंधन दरात वाढ झाल्याने कोरोनाच्या संकटामुळे आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना यामुळे अडचणींचा सामना करावा लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जाणून घ्या नवे दर
मुंबई - पेट्रोल 96 रुपये, डिझेल 86.97 रुपये प्रति लीटर
बंगळुरू - पेट्रोल 89.54 रुपये, डिझेल 84.72 रुपये प्रति लीटर
दिल्ली - पेट्रोल 92.48 रुपये, डिझेल 79.95 रुपये प्रति लीटर
चेन्नई - पेट्रोल 91.73 रुपये, डिझेल 85.05 रुपये प्रति लीटर
कोलकाता - पेट्रोल 90.79 रुपये, डिझेल 83.54 रुपये प्रति लीटर
पेट्रोलच्या दराने गाठली 'शंभरी' अन् पंपचालकांनी लगेचच थांबवली विक्री; जाणून घ्या कारण
पेट्रोलच्या दराने 'शंभरी' गाठली असून पंपचालकांनी लगेचच विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये इंधनाच्या किमतीत वाढ झाल्यानंतर लगेचच जुन्या पेट्रोल पंपावर प्रीमियम पेट्रोलची विक्री बंद करण्यात आली आहे. प्रीमियम पेट्रोलचा दर हा प्रति लीटर तब्बल 100 रुपयांच्या वर गेला आहे. पेट्रोल पंपावर असलेल्या जुन्या मशीनमध्ये तीन डिजिट दाखवले जात नाही आहेत. त्यामुळेच साध्या पेट्रोलचा दर हा प्रति लीटर 100 च्या वर गेल्यानंतर देखील अनेक पेट्रोल पंपावर त्याची विक्री बंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी पेट्रोलचे भाव वाढल्यानंतर सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी संसदेत पेट्रोलियम उत्पादनांवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा सध्या कोणताही विचार नसल्याचं म्हटलं आहे.
कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर 25 ते 30 रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते. पेट्रोल, डिझेलची सध्याची किंमत पाहिली, तर त्यात करांचं प्रमाण तब्बल 65 ते 70 टक्के इतकं आहे.
कसे ठरतात पेट्रोल, डिझेलचे दर?
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किमती, हे तेल भारतात आणण्यासाठी करण्यात येणारा खर्च, रुपयाच्या तुलनेतील डॉलरचा दर यानुसार इंधनाचा दर निश्चित होतो. यानंतर पेट्रोल, डिझेलचा दर 25 ते 30 रुपये प्रति लिटरपर्यंत जातो. पण त्यानंतर केंद्र सरकार, राज्य सरकारं त्यावर विविध कर लावतात. त्यामुळे पेट्रोल, डिझेलची किंमत वाढत जाते.