ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि.१५ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमतीमध्ये मोठी घट झाल्याचा परिणाम म्हणून शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.२५ रुपये आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ४२ पैशांची घट करण्यात आली. पेट्रोल व डिझेलच्या दरात कपात करण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. ही नवी दरकपात शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच लागू करण्यात आली.याआधी १ जुलैमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर ८९ पैसेआणि डिझेलचे दर प्रति लिटर ४९ पैशांनी कमी करण्यात आले होते. तथापि त्याआधी १ मेपासून सलग चारवेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती.
पेट्रोल २.२५ रुपये तर डिझेल फक्त ४२ पैशांनी स्वस्त
By admin | Published: July 15, 2016 9:50 PM