नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या महागाईदरम्यान, सर्वसामान्य जनतेसाठी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. केंद्र सरकार लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची घोषणा करू शकते. सूत्रांनी दिलेल्य माहितीनुसार १ एप्रिल २०२३ पासून काही निवडक पेट्रोल पंपांवर २० टक्के इथेनॉल ब्लेंडिंग असलेलं पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. सरकार पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींवर लगाम घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून इथेनॉलच्या ब्लेंडिंगवर भर देत आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. आता या किमती कमी व्हाव्यात यासाठी इथेनॉल ब्लेंडिंग करण्यावर लक्ष्य केंद्रित करत आहे. त्याअंतर्गत केंद्र सरकार २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉलच्या मिश्रणाचे म्हणजेच ब्लेंडिंगचे टार्गेट ठेवले आहे. मात्र आधी हे लक्ष्य २०३० पर्यंत गाठण्याचे लक्ष्य होते, त्यानंतर ते घटवण्यात आले.
इथेनॉल केवळ ६२ रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. त्यामुळे पेट्रोलियम मंत्री नितीन गडकरी त्यासाठी खास योजना आखत आहेत. केंद्र सरकार केवळ साखरच नाही तर धान्य आणि अन्य टाकाऊ पदार्थांपासून इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी योजना आखत आहे. सरकार देशात असलेल्या Sedimentary Basin च्या माध्यमातून इथेनॉलचे उत्पादन वाढवणार आहे. त्याशिवाय Green Hydrogenवरही लक्ष्य केंद्रीत केले जाणार आहे.
सध्या देशातील सरासरी सहा कोटी लोक पेट्रोल पंवावर जातात आणि देशामध्ये दररोज पाच मिलियन बॅरल तेल वापरले जाते. सध्या ओएमसीची डिझेवर अंडर रिकव्हरी किंमत २४ ते २६ रुपये आहे आणि पेट्रोलवर ९ ते ११ रुपये आहे. अशा परिस्थितीत क्रूड ऑईलची किंमत घटल्यावरच पेट्रोल-डिझेलच्या किमती घटतील.