नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. मुंबईत आज पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज पेट्रोलसाठी 74.47 रुपये मोजावे लागतील. डिझेलच्या दरातही 25 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे मुंबईत डिझेलचा दर 65.76 रुपयांवर आला आहे. पेट्रोल व डिझेलच्या देशांतर्गत किंमतींनी चालू वर्षातील नवा नीचांक नोंदवला आहे.
दिल्लीतही इंधनाचे दर घटले आहेत. दिल्लीतही पेट्रोल 20 पैशांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे एक लिटर पेट्रोलसाठी 68.84 रुपये मोजावे लागणार आहे. तर डिझेलच्या दरात 23 पैशांची घट झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 62.86 रुपयांवर आला आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - मुंबई)
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये घसरण होत आहे. इंधनाची किंमत डॉलरचा दर व आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव यावर निश्चित होते. दोन महिन्यांपासून कच्चे तेल महाग झाले होते. पण आता ते काही प्रमाणात स्वस्त झालं आहे.
(सौजन्य : पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम - दिल्ली)