नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईतपेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत गुरुवारी (6 सप्टेंबर) पेट्रोल 19 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 22 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 86.91 तर डिझेलचा प्रति लिटर दर 75.96 झाला आहे. याआधी मुंबईत मंगळवारी (4 सप्टेंबर) पेट्रोलचा सर्वाधिक दर म्हणजेच प्रति लिटर 86.72 इतका होता.
इंधन दरवाढ नव्हे, जनतेची लूटमार; पेट्रोल व डिझेलचा समावेश जीएसटीमध्ये करण्याची गरज
राजधानी दिल्लीत पेट्रोल 20 पैसे तर डिझेल 21 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एका लिटरमागे 79.51रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 71.55 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
इंधन दरवाढीत राज्याने कमावले १८९६ कोटी; १ रुपया दरवाढीमागे मिळतात १७ कोटी
सलग 10 दिवस पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरू आहे. खाद्यान्न, धान्य, भाजीपाला यांची वाहतूक डिझेलच्या वाहनाने होत असते. ही वाहतूक करणाऱ्या मालवाहतूकदारांनी डिझेल 68 रुपये प्रति लिटरवर असताना मालभाड्याचा दर निश्चित केला होता. डिझेल 74 रुपये होईपर्यंत आम्ही सहन करू, पण त्यानंतर भाडेदरात वाढीचा विचार करावा लागेल, असे मालवाहतूकदारांनी ‘लोकमत’ला सांगितले होते. ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना भीषण महागाईचा सामना करावा लागणार आहे. धान्ये, खाद्यान्न, भाजीपाला, प्रवास सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडण्याची भीती आहे.