नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींत प्रचंड वाढ झाली आहे. दोन्ही इंधनांच्या दरांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यातच अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील पायाभूत सेवासुविधांच्या विकासासाठी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत अनुक्रमे अडीच आणि चार रुपयांचा अधिभार लावण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी लगोलग झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींत पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. एकाच वर्षात पेट्रोल आणि डिझेल जवळपास १५ रुपयांनी भडकले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत झालेली वाढ व सौदी अरेबियाने कमी केलेले तेल उत्पादन यांचा एकत्रित परिणाम पेट्रोल- डिझेलच्या दरांवर होत आहे. कारण कच्च्या तेलाच्या महागाईचे... पण स्थिती मात्र उलटी७ फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजे वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव ५५ डॉलर प्रती बॅरल एवढा होता. आता तो ५७ डॉलर प्रती बॅरेल आहे. यात जवळपास ४ ते ५ टक्केच वाढ झाली आहे. त्या तुलनेत पेट्रोल डिझेल २० टक्क्यांनी महागले आहे. दरवाढीची कारणेआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम भारतातील इंधन दरांवर होतोरुपये आणि डॉलर यांच्यातील विनिमय दराचाही इंधनाच्या किमतींवर परिणाम होतोइंधनाच्या दरवाढीत उत्पादन शुल्क आणि मूल्यवर्धित कर यांचा ६३ टक्के वाटा असतो
पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वर्षभरात १५ रुपयांचा भडका; ३६५ दिवसांत २०% भाववाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2021 7:26 AM