नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत असून मुंबईतपेट्रोलच्या दराने उच्चांक गाठला आहे. मुंबईत सोमवारी (3 सप्टेंबर) पेट्रोल 31 पैसे प्रति लिटर आणि डिझेल 44 पैसे प्रति लिटर महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 86.56 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 75.54 झाला आहे. याआधी मुंबईत 29 मे रोजी मुंबईत पेट्रोलचा सर्वाधिक दर म्हणजेच प्रतिलिटर 86.24 इतका होता.
(सौजन्यः पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)
राजधानी दिल्लीत पेट्रोल 31 पैसे तर डिझेल 39 पैशांनी प्रतिलिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 79.15 रुपये तर डिझेलसाठी प्रतिलिटर 71.15 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त महाग पेट्रोल हे अमरावतीत मिळत आहे. अमरावतीत आजचा पेट्रोलचा प्रतिलिटर दर 87.97 तर डिझेलचा प्रतिलिटर दर 77.09 झाला आहे.
तेलाच्या किंमतीबाबत यूपीए सरकारवर भाजपा सतत टीका करीत असे. पण मोदी यांचे सरकार आज काहीही कारणे सांगो, पण तेलाच्या या खेळात सरकार मालामाल होत आहे. लोकांना 2012 च्या तुलनेत आज फार मोठी किंमत चुकवावी लागत आहे. सरकारच्या तिजोरीत कराद्वारे येणारा महसूल वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सततच्या दरवाढीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.