लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या काही आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या दरांमध्ये माेठी घसरण झाली आहे. भारताला रशियाकडूनही स्वस्त तेल मिळत आहे. त्यामुळे पेट्राेल आणि डिझेलच्या दरात कपात कधी हाेते, याकडे देशवासीयांचे डाेळे लागले आहेत. मात्र, त्यांचा भ्रमनिरास हाेण्याचीच शक्यता आहे. तेल कंपन्यांकडून इंधनाची दरकपात हाेईल, असे संकेत सरकारकडून मिळालेले नाही. उलट काही राज्यांनी व्हॅट कमी केल्याचे कारण देऊन सरकारने हात झटकले आहेत.
केंद्रीय पेट्राेलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी लाेकसभेत सरकारची बाजू मांडली. सिंह म्हणाले, की केंद्राने पेट्राेल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले. त्यानंतर काही राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केली. मात्र, सहा राज्यांनी व्हॅट कमी केलेला नाही. म्हणूनच या राज्यांमध्ये पेट्राेल आणि डिझेल महाग आहे, असे सांगितले. पुरी यांच्या उत्तराने असंतुष्ट विराेधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला.
२२ मे राेजी घटले हाेते दरपश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि झारखंड या राज्यांनी व्हॅटमध्ये कपात केलेली नाही. केंद्राने २१ नाेव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ राेजी उत्पादन शुल्कात कपात केली. त्यानंतर पेट्राेल आणि डिझेलचे दर अनुक्रमे १३ आणि १६ रुपये प्रति लीटरने घटले. काही राज्यांनी व्हॅट कमी केल्यानंतर त्या ठिकाणी जनतेला दिलासा मिळाला हाेता. तेव्हापासून देशभरात पेट्राेल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत.
तेल कंपन्यांना २७ हजार काेटींचा ताेटाn कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे तेल कंपन्यांना २७ हजार २७६ काेटी रुपयांचा ताेटा झालेला आहे. n अनेक देशांमध्ये इंधन महाग झाले आहे. मात्र, भारतात त्या तुलनेत तेवढी दरवाढ झालेली नाही, असे पुरी म्हणाले. n सध्या कच्च्या तेलाचे दर ७६ ते ८० डॉलर प्रतिबॅरल दरम्यान आले आहेत.
६ एप्रिलपासून दरवाढ केलेली नाहीn नाेव्हेंबर २०२० ते नाेव्हेंबर २०२२ दरम्यान कच्च्या तेलाचे सरासरी दर १०२ डाॅलर्स प्रतिबॅरल राहिले. n त्यातुलनेत पेट्राेल आणि डिझेलच्या दरात १८.९५ आणि २५.५ टक्के वाढ झाली आहे.n तेल कंपन्यांनी दरवाढ ६ एप्रिलपासून केलेली नाही.