देशभरात पेट्रोल आणि डिझेलची होत असलेली दरवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी अतिशय चिंताजनक बनलयी. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दैनिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळेच, हळहळू होणारी दरवाढ लक्षात येत नाही, त्यातूनच 100 रुपये प्रतिलीटर झालेलं पेट्रोल कधी 120 रुपयांपर्यंत पोहोचलं तेही अनेकांच्या लक्षात आलं नाही. त्यामुळे, विरोधकांसह सर्वसामान्य नागरिकही चांगलेच वैतागले आहेत. आता, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांनीही इंधन दरवाढीवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सीमावर्ती जिल्हा अनूपपूर (Anuppur District) येथे शनिवारी पहिल्यांदाच पेट्रोलच्या किमती 121 रुपये प्रति लीटरवर पोहोचल्या आहेत. तर, डिझेलचा (Diesel) दर 110 रुपयांवर पोहोचला आहे. उद्योग जगतातील (Industry) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनूपपूर येते पेट्रोलचा दर 121.13 रुपये प्रति लीटर, तर डिझेलचा दर 110.29 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. याच बरोबर बालाघाट मध्ये पेट्रोलचा दर 120 रुपयांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. मात्र, पर्याय नसल्याने पेट्रोलची दरवाढ स्विकार करावीच लागते. दररोज 30 ते 50 पैसे या दराने झालेली ही दरवाढ आता 113 रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळेच, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.
संध्याकाळी पेट्रोलची टाकी फुल्ल करा, दुसऱ्यादिवशी सकाळी 35 पैसे नफा कमवा, मग तुम्हीच सांगा हे नुकसान कसं? हे तर सरकार जनहितार्थ करत आहे, असे स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवरुन म्हटलंय. मालीवाल यांनी मोदी सरकारला उपरोधात्मक टोला लगावला आहे.
एक दिवासांनी होतेय वाढ
छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या अनुपपूरमधील बिजुरी येथील पेट्रोल पंप चालक अभिषेक जायसवाल यांनी सांगितले, की, गेल्या 24 तासांत पेट्रोलच्या दरात ३६ पैसे, तर डिझेलच्या दरात ३७ पैसे प्रति लिटरने वाढ झाली. जयसवाल म्हणाले, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 250 किमी अंतरावर असलेल्या जबलपूर ऑईल डेपोतून पेट्रोल आणले जाते, यामुळे वाहतूक खर्च जास्त असल्याने ते राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत येथे महाग होते.
पेट्रोल 150 तर डिझेल 140 रुपये लिटर होणार? -
येणाऱ्या नव्या वर्षात पेट्रोलचा दर 150 रुपये लीटर तर डिझेलचा दर 140 रुपये लीटर होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. करामधील भरमसाट वाढ आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातील तेजी याचा हा परिणाम आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर सध्या प्रतिबॅरल 85 डॉलर झाले आहेत. ‘गोल्डमॅन’च्या अंदाजानुसार, या वर्षाच्या अखेरपर्यंत कच्चे तेल 100 डॉलरवर जाईल. पुढील वर्षी ते 110 डॉलरवर पोहोचेल. 2008 मध्ये कच्च्या तेलाचे दर सर्वाधिक 147 डॉलर प्रतिबॅरल होते. हा टप्पाही लवकरच गाठला जाऊ शकतो.