नवी दिल्ली: बिहारबाबत नवनवे दावे केले जात आहेत. अलीकडेच बिहारमधील जमुई गावात सोन्याच्या खाणी सापडल्याचे संकेत मिळाले होते, त्यानंतर प्रशासनाने तेथे तपासणी आणि शोध घेण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर आता आणखी एक दावा केला जात आहे. बिहारच्या बक्सर आणि समस्तीपूरमध्ये पेट्रोलियम साठा असल्याचा दावा केला जात आहे.
समस्तीपूर जिल्ह्यातील 308 किमी आणि बक्सरच्या 52.13 चौरस क्षेत्रामध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे संकेत सापडले आहेत. आता हा साठा शोधण्यासाठी बिहार सरकारने ओएनजीसीला(ONGC) मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गंगेच्या खोऱ्यातही हे पेट्रोलियम साठ्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता सरकारकडून मान्यता मिळाल्यामुळे लवकरच ओएनजीसीकडून याचा शोध घेतला जाईल.
येत्या काही दिवसांत अपेक्षेप्रमाणे निकाल लागल्यास बक्सर आणि समस्तीपूरसह बिहारचे नशीब बदलू शकते. बक्सर जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या पत्रानुसार, गंगेच्या खोऱ्यात एकूण 302.57 चौरस किलोमीटरमध्ये पेट्रोलियमचे साठे आहेत, त्यापैकी 52.13 चौरस किलोमीटर बक्सरमध्ये आणि उर्वरित उत्तर प्रदेशच्या सीमेवर असल्याचा अंदाज आहे.
गंगा खोऱ्यात पेट्रोलियम उत्पादनेगृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, समस्तीपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या गंगा खोऱ्यात पेट्रोलियम पदार्थ असल्याचा अंदाज आहे. पेट्रोलियम मंत्र्यांशी बोलल्यानंतर समस्तीपूरमध्ये तेलाचा साठा मिळण्याबाबत पक्की माहिती देऊ, असे ते म्हमाले.