शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील दरोड्याचा छडा -१

By admin | Published: August 20, 2015 10:10 PM

सहा आरोपी गजाआड : गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी

सहा आरोपी गजाआड : गुन्हे शाखा पोलिसांची कामगिरी
नागपूर : हुडकेश्वरमधील पेट्रोल पंपावरील गार्डला गंभीर जखमी करून एक लाख रुपये लुटून नेणाऱ्या आरोपींना हुडकून काढण्यात गुन्हेशाखेच्या पथकाने यश मिळवले. या दरोड्यातील सात पैकी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून दोन कार तसेच मोबाईलसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी गुरुवारी पत्रकारांना ही माहिती दिली.
पेट्रोल पंपावर संजय भाऊराव गजभिये (वय ५०, रा. रा. स्वामीधाम इसेंन्सी, घोगली) हे बेसा, बेलतरोडी मार्गावरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर सुरक्षा रक्षक म्हणून कर्तव्यावर होते. ३ ऑगस्टच्या पहाटे २.३० ते २.४५ च्या सुमारास लुटारू आले आणि त्यांनी गजभियेंना मारहाण करून कार्यालयातील एक लाख रुपयांची रोकड लुटून नेली. गुन्हेशाखेच्या पोलिसांना या दरोड्यात स्विफ्ट कार वापरल्याची माहिती कळाली. तो धागा धरून पोलिसांनी तपास केला. कारमालकाने घटनेच्या काही तासांपूर्वी सेंटर पॉईंट हॉटेलसमोरून ही कार चोरी गेल्याची माहिती दिली. पूर्वनियोजित कटानुसार आरोपी शानू शुक्ला हॉटेल सेंटर पॉइंर्टसमोर उभा होता. कारमालक (एमएच ३१/ सीके २२४३) येताच समोर जाऊन शानूने त्याला सॅल्यूट केला आणि आपण हॉटेलचे कर्मचारी आहोत, पार्किंगमध्ये कार लावतो, असे सांगत कारमालकाकडून चावी घेतली. पोलिसांनी त्याआधारे तपास करून आरोपींचे धागेदोरे जुळविले. त्यानंतर शानू जयनारायण शुक्ला (वय २३, रा. बजरंगनगर), अखिल प्रकाश वांडरे (वय २१, रा. रमजीवीनगर) निखील अरविंद गिरी (वय २४, रा. गंगानगर), अक्षय लक्ष्मणराव अबलनकर (वय २०, रा. रामेश्वरी), विक्की ऊर्फ रिंक्या राजू खोंडे (वय २१, रा. कुकडे ले आऊट), प्रशांत दिनेश तामने (वय २१, रा. कैलास नगर) यांना अटक केली. या दरोड्याची टीप राजू नामक व्यक्तीकडून आरोपींना मिळाली. पोलीस त्याचा शोध घेत असल्याचेही तरवडे यांनी सांगितले. यावेळी गुन्हेशाखेचे उपायुक्त (डिटेक्शन) रंजन शर्मा आणि उपायुक्त (ईओडब्ल्यू) तसेच एसीपी नीलेश राऊत यांनीही या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात वेगवेगळी माहिती दिली.
--
जोड आहे...