बैतूल : पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. वाढत्या किमतीही शेतकऱ्यांसाठी समस्या बनत आहेत. अशा परिस्थितीत एका शेतकरीपेट्रोल पंप मालकाने आपल्या कमिशनमधील हिस्सा न घेता शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात भेट दिली आहे. डिझेलच्या दरात 2 रुपये प्रति लीटरची सवलत दिली आहे. या पंप मालकांने खरीप कापणीपासून रब्बी पेरणीपर्यंत दोन महिन्यांसाठी शेतकऱ्यांना डिझेलवर ही सूट दिली आहे. (Petrol Pump Owner Took Bold Step 2 Rupees Per Liter Discount On Diesel Giving Out Of Commission Betul)
पेट्रोल पंप मालकाच्या या निर्णयामुळे शेतकरी खूप आनंदी आहेत. दरम्यान, बैतूलमध्ये डिझेल प्रतिलिटर 104 रुपयांच्या पुढे गेले आहे आणि पेट्रोल प्रतिलिटर 114 रुपयांवर गेले आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईमुळे अनेकांनी आपल्या खाजगी वाहनांनी प्रवास करणेही बंद केले आहे. तसेच, शेतकरी सुद्धा महागाईच्या झळा सोसत आहेत.
बैतूलमध्ये पेट्रोल -डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे एनएच 47 वरील बैतूल मार्केटच्या पेट्रोल पंप ऑपरेटरने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. ज्या ग्राहकांनी 30 लिटरपेक्षा जास्त डिझेल घेतले, त्यांच्यासाठी 2 रुपयांनी किंमत कमी केली आहे.
या पेट्रोल पंपाचे मालक राजीव वर्मा हे सुद्धा एक शेतकरी आहेत. डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांवर कुठेतरी परिणाम होत आहे, असे त्यांना वाटते. त्यामुळे राजीव वर्मा यांनी आपल्या पेट्रोल पंपावर डिझेलची किंमत प्रति लिटर 2 रुपयांनी कमी केली आहे.
राजीव वर्मा म्हणाले की, सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना डिझेलची गरज भासणार आहे आणि महागाई त्यांच्यावर परिणाम करत आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन सरकारने डिझेलची किंमत कमी करावी. जर किंमत कमी होत नसेल तर ती जीएसटीच्या कक्षेत आणली पाहिजे जेणेकरून संपूर्ण देशात डिझेलची किंमत सारखीच राहील.