नवी दिल्ली : सलग दोनदा दरकपात केल्यानंतर सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोलच्या दरात ३.९६ रुपये आणि डिझेलच्या दरात २.३७ रुपयांची वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलची ही दरवाढ गुरुवारच्या मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे.याआधी १६ एप्रिलला पेट्रोलच्या दरात ८० पैसे आणि डिझेलच्या दरात १.३० रुपयांची कपात करण्यात आली होती. तर त्याआधी २ एप्रिलला पेट्रोल ४९ पैसे आणि डिझेल १.२१ रुपयांनी स्वस्त झाले होते. आजच्या दरवाढीमुळे दिल्लीत पेट्रोल प्रतिलिटर ५९.२० रुपयांऐवजी ६३.१६ रुपयांत तर डिझेल प्रति लिटर ४७.२० रुपयांऐवजी ४९.५७ रुपयांत विकले जाईल, असे भारतातील सर्वांत मोठी तेल कंपनी इंडियन आॅईलने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
पेट्रोल ३.९६ तर डिझेल २.३७ रुपयांनी महाग
By admin | Published: May 01, 2015 2:45 AM