शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

PM मोदींवर हल्ल्याचा आणि यूपीत स्फोटांचा रचला होता कट; PFIच्या कारस्थानांबाबत EDचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 11:24 AM

नापाक मनसुब्यांसाठी जमवले 120 कोटी रुपये...!

नवी दिल्ली - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. 12 जुलैला त्यांच्या पटणा रॅलीमध्ये स्फोट घडविण्याची तयारी करण्यात आली होती. यासाठी पीएफआयचे टेरर मॉड्यूल घातक शस्त्रास्त्रे जमविण्याच्या कामास लागले होते. एढेच नाही, तर पीएम मोदींच्या रॅलीवर हल्ला करण्यासाठी ट्रेनिंग कॅम्पचे आयोजनही करण्यात आले होते, असा खळबळजनक खुलासा अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. याशिवाय, पीएफआयने यूपीमध्येही संवेदनशील ठिकाणी आणि महत्वाच्या लोकांवर एकाच वेळी हल्ला करण्याची तयारीही कोली होती, असेही ईडीने म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे, जुलै महिन्यात पाटणा येथून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या संशयितांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या दस्तएवजांमध्ये 'इंडिया 2047' नावाने पीएफआयचे बुकलेटही होते. यात 2047 पर्यंत भारताला मुस्लीम देश बनविण्याचे 'दहशतवादी ब्ल्यूप्रिंट' होते. याच वेळी, पीएफआय आपल्या नापाक मनसुब्यांसाठी जागो-जागी ट्रेनिंग कॅम्प लावत आहे, असेही समोर आले होते.

पीएम मोदीच्या रॅलीवर हल्ला करण्याच्या हेतूने लावले होते ट्रेनिंग कॅम्प -ईडीने गुरुवारी केरळमधून अटक करण्यात आलेल्या पीएफआयच्या शफिक पायथच्या रिमांड नोटमध्ये खळबळजनक दावा केला आहे. PFI ने यावर्षी 12 जुलैला पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीदरम्यान हल्ल्या करण्याच्या उद्देशाने ट्रेनिंग कॅम्प लावला होता. विशेष म्हणजे, ऑक्टोबर 2013 मध्ये पाटणा येथील गांधी मैदानात नरेंद्र मोदींच्या निवडणूक रॅलीवर दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित जिहादी दहशतवाद्यांनी घडवून आणला होता.

नापाक मनसुब्यांसाठी जमवले 120 कोटी रुपये -देशभरात दंगे आणि दहशतवादी कारवाया करण्याच्या हेतूने PFI ने गेल्या काही वर्षांत 120 कोटी रुपये जमवले आहेत. या फंडात अधिकांस हिस्सा कॅशमध्ये आहे. ईडीकडे याची संपूर्ण माहिती आहे. राष्ट्रीय तपास संस्था आणि ईडीने गुरुवारी देशभरात पीएफआयविरुद्ध राबविलेल्या सर्वात मोठ्या ऑपरेशनमध्ये पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. एकूण 15 राज्यांमध्ये 93 ठिकाणी पीएफआयच्या कार्यालयांवर आणि संघटनेच्या काही नेत्यांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. या कारवाईत स्थानिक पोलिसांचाही समावेश होता. 

UP मध्ये संवेदनशील ठिकाणांवर आणि काही महत्वाच्या लोकांवर एकाच वेळी हल्ला करण्याचा होता कट- ईडीने पीएफआयवर 'देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला' धोक्यात' टाकणाऱ्या कारवाया केल्याचा आणि कट रचल्याचा आरोप केला आहे. तपासादरम्यान पीएफआय आणि त्याचे सदस्य, यांच्या बँक अकाउंट्सचे विश्लेषणही करण्यात आले आणि आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाBiharबिहारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय