पीएफआय समर्थकांची केरळमध्ये तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:33 PM2022-09-24T12:33:59+5:302022-09-24T12:34:27+5:30
पीएफआयच्या समर्थकांनी मोर्चा काढला. वाहने रोखली, विविध ठिकाणी जबरदस्तीने दुकाने बंद करायला भाग पाड
तिरुवनंतपूरम : देशात दहशतवादी कारवायांचे समर्थन केल्याचा आरोप करत एनआयए व अन्य एजन्सीने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) पीएफआयच्या कार्यालयांवर आणि नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर गुरुवारी धाडी टाकल्या. त्याविरोधात शुक्रवारी पीएफआयने केरळात संपाचे आवाहन केले होते. मात्र, या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक परिवहनाच्या बसवर, दुकानांवर दगडफेक झाली.
पीएफआयच्या समर्थकांनी मोर्चा काढला. वाहने रोखली, विविध ठिकाणी जबरदस्तीने दुकाने बंद करायला भाग पाडले. जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलिसांसह काही चालक, प्रवासी जखमी झाले. केरळ उच्च न्यायालयाने पीएफआयच्या संपाची आणि राज्यात झालेल्या हिंसाचाराची दखल घेतली आहे.