सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजला आहे. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी लस हा प्रभावी उपचार असल्याचं अनेकांचं म्हणणंही आहे. सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. परंतु कोरोनापासून लहान मुलांचंही संरक्षण व्हावं यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी फायझरनं (Pfizer) लस विकसित केली आहे. आपली कोरोना प्रतिबंधात्मक लस (Covid Vaccine) भारतात सापडलेल्या कोरोनाच्या व्हेरिअंटवरही प्रभावशाली आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी केंद्र सरकारला सांगितलं की फायझरची ही लस १२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्वच व्यक्तींवर प्रभावशाली दिसली आहे. तसंच दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानात कोल्ड स्टोरेजमध्ये ही लस एका महिन्यापर्यंत साठवली जाऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, कंपनीनं लसीच्या वापरासाठी फास्ट ट्रॅक मंजुरी देण्यासाठी विनंती केली आहे. याशिवाय प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाईसारख्या दाव्यांतून सुरक्षेसहित महत्त्वाच्या बाबतीत नियमकानं सूट दिली तर जुलै ते ऑक्टोबर या काळात ५ कोटी डोस रोल आऊट करेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. सध्या देशात Covishield, Covaxin आणि Sputnik V या लसींच्या वापरास मंजुरी मिळाली आहे. यांना कोणत्याही प्रकारची सूट सरकारनं दिली नाही जशी Pfizer कडून मागण्यात येत आहे. लस प्रभावशाली फायझरनं त्यांच्या कोरोना लसीच्या वापरासाठी मंजुरी मागत भारतीय अधिकाऱ्यांना ही लस भारतात सापडलेल्या व्हेरिअंटबाबतही अधिक प्रभावशाली असल्याचं म्हटलं. तसंच ही लस१२ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांनाही दिली जाऊ शकतं असं कंपनीनं म्हटलं आहे. कंपनीची नुकतीच भारतीय अधिकाऱ्यांसोबत एक बैठक पार पडली. यामध्ये जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य देशांमध्ये केलेल्या चाचणीद्वारेर ही लस किती प्रभावी आहे यासंदर्भातील समोर आलेली आकडेवारीही सादर करण्यात आली. "भारतात सद्यस्थिती सामान्य नाही. अशा परिस्थितीत सामान्यरित्या वापरली जामारी प्रक्रिया वापरली जाऊ नये," असं भारतासोबत चर्चेत सहभागी असलेल्या फायझरच्या एका उच्चपदस्थ सूत्रानं सांगितलं.
'१२ वर्षांवरील मुलांसाठी लस तयार'; Pfizer नं केंद्र सरकारकडे मागितली 'फास्ट ट्रॅक' मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 10:42 AM
Coronavirus Vaccine : अमेरिकन दिग्गज फार्मा कंपनीनं या लसीच्या वापरासाठी सरकारकडे मागितली परवानगी. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत पाच कोटी डोस देणार असल्याचं केलं वक्तव्य.
ठळक मुद्देअमेरिकन दिग्गज फार्मा कंपनीनं या लसीच्या वापरासाठी सरकारकडे मागितली परवानगी. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत पाच कोटी डोस देणार असल्याचं केलं वक्तव्य.