उत्तर प्रदेशएटीएस आणि छत्तीसगडच्या पोलीस पथकानने संयुक्त कारवाई करत एका संशयित आयएसआयएस दहशतवाद्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा संशयित दहशतवादी अलिगढ मुस्ली युनिव्हर्सिटीतून पीएचडी करत होता. आरोपी हा अलिगढ येथील स्थानिक रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, युपी एटीएस पथकाने आरोपीला ट्रांजिड रिमांडमध्ये लखनौ येथे नेले आहे. भिलाई येथून त्यास अटक करण्यात आली होती.
भिलाई येथील एसबीआय कॉलनीतील रुम नंबर १२७/८ मध्ये गुपचूपपणे राहात होता. वजीहुद्दीन नावाने आरोपीची ओळख समोर आली आहे. दहशतवादी संघटना ISIS सोबत वजीहुद्दीनचा थेट संपर्क असल्याच संशय़ पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. त्यासबोतच्या काही सदस्यांना देशविरोधी कृत्यामध्ये अटकही करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वच आरोपी हे आयएसआयएसशी संबंधित आहेत. या आरोपीच्या कारवाईसंदर्भात अगोदरच दुर्ग पोलिसांना सूचना देण्यात आली होती. झांसी येथील एटीएस पथक वजीहुद्दीनला ट्रॅक करण्यासाठी छत्तीसगढच्या दुर्ग जिल्ह्यात पोहोचले होते. त्यानंतर, एटीएसने आरोपीविरुद्ध भादंवि आणि बेकायदा कृत्य अधिनियमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. २४ तासांच्या शोधमोहिमेनंतर आरोपीला पकडण्यात यश आल्याचे एटीएस पथकाने सांगितले.
दुर्ग पोलिसांनी वजीहुद्दीनला एटीएस पथकाच्या स्वाधीन केलं असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. वजीहुद्दीनची प्राथमिक चौकशी केली असता, आपण अलिगढ मुस्लीम युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांच्यासोबत आहोत. तर, आयएसआयएस या संघटनेच्या विचारधारेने प्रेरित असल्याचं त्याने म्हटले. दरम्यान, वजीहुद्दीनचा थेट संबंध आयएसआयएसच्या सदस्य मोहम्मद रिजवान याच्यासोबत असल्याचीही माहिती समोर आली आहे.