अहमदाबाद - आधीपेक्षा कमी बहुमताने सलग सहाव्या वेळा सत्तेवर आलेल्या गुजरातमधील भाजपाच्या नव्या सरकारमध्ये शपथविधीनंतर लगेचच धुसफूस सुरू झाली होती. महत्त्वाची खाती न मिळाल्याने उपमुख्यमंत्री नितीन पटेल नाराज झाले होते. पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमित शहां यांना त्यांची नाराजी दूर करण्यात यश आलं आहे.
पटेल म्हणाले की, आता मी गुजरात सरकारमध्ये मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मला तोलामोलाचे खाते तुम्हाला दिले जाईल तुमच्यावर अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले असून, त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे. तसेच काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही असेही पटेल यांनी स्पष्ट केले. आज सकाळी ७.३० वाजता मला अमित शहांचा फोन आला. तुमची नाराजी मी समजू शकतो. मात्र आम्ही तुम्हाला असे खाते देऊ ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. असे आश्वासन मला शहांनी दिले त्यामुळे नाराज होण्याचा प्रश्न उरलाच नाही. लवकरच आपल्याला देण्यात आलेल्या मंत्री पदाचा पदभार स्वीकारणार असल्याचं त्यांनी सांगितले.
हा काही खात्यांचा प्रश्न नसून तो माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न असल्याचं त्यांनी म्हंटले होतं. तसेच पक्षनेतृत्व याबाबत माझ्या भावना समजून घेईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. मात्र आता पक्षनेतृत्वाने त्यांच्या भावना समजून घेतल्याने त्यांची नाराजी दूर झाली आहे. याबाबत खुद्द नितीन पटेल यांनीच खुलासा केला आहे.
आधीच्या मंत्रिमंडळातही नितीन पटेल उपमुख्यमंत्री होते व त्यांच्याकडे वित्त, नगरविकास व पेट्रोलियम अशी महत्वाची खाती होती. नव्या मंत्रिमंडळात त्यांचे पद कायम राहिले पण त्यांना पूवीर्ची खाती न देता तुलनेने दुय्यम खाती दिली गेल्यामुळं ते नाराज होते.