शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

आसामचा पूर आणि अहवालात फोटो बांगलादेशचा

By admin | Published: August 01, 2016 5:47 AM

आसाममधील भयंकर पुरानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आसामच्या दौऱ्यावर गेले होते.

गुवाहाटी : सरकारी यंत्रणा कधी काय करील याचा नेम नाही. आता हेच पाहा ना, आसाममधील भयंकर पुरानंतर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे आसामच्या दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या पुराचा अहवाल दिला आणि पुराची भीषणता दर्शविणारी काही छायाचित्रेही सोबत जोडली. त्यातीलच हे एक छायाचित्र. या तरुणाच्या डोळ्यापर्यंत पाणी पोहोचले आहे; पण हरिणाचा जीव वाचविण्यास हा आटापिटा चालला आहे. पण खरी गोम तर इथेच आहे. कारण, हे छायाचित्र आसामचे नसून बांगलादेशातील २०१४ च्या नोखालीतील पुराचे आहे. (वृत्तसंस्था)बांगलादेशातील पुराचे हे चित्र वन्यजीव छायाचित्रकार हसीबूल वहाब यांनी टिपलेले आहे. अगदी जगभरातून या छायाचित्राला खूप प्रतिक्रिया मिळाल्या. अर्थात, ही मोठी चूक असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे; पण काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातही अशीच परिस्थिती होती. त्यामुळे ही गडबड झाली, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकरणात जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.>पुराचा २७.५० लाख लोकांना फटकाबिहारमधील पुराचा फटका २७.५० लाख लोकांना बसला असून, राज्याच्या १२ जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती गंभीरच आहे. उत्तर प्रदेशात अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बिहारमध्ये पुराने २६ जणांचा बळी घेतला.१२ जिल्ह्यांत नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. २०० लाख हेक्टरवर २७.५० लाख लोकांना या पुराचा फटका बसला, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने निवेदनात सांगितले. वैद्यकीय मदतीची शिबिरेआसाम, बिहारसह देशाच्या पूरग्रस्त भागांतून दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना वाचविण्यात आले, असे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) रविवारी सांगितले. आसाम आणि बिहारमध्ये एनडीआरएफने वैद्यकीय शिबिरेही सुरू केली आहेत. >लखनौमध्ये पूरस्थितीउत्तर प्रदेशात सततधार पावसामुळे गंगेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे अनेक खेड्यांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय जल आयोगाने शारदा नदीचे पाणी सतत वाढत असून पालिया येथे ती धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे, असे सांगितले. अयोध्येतील तुरतीपर आणि एल्जिन ब्रिज येथे घागरा नदी सतत धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. रापती नदी बलरामपूर, बन्सी, रिगाऊली, बिर्द घाट (गोरखपूर) येथे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. गंगा नदीचे पाणी फतेहगढ, कनौज आणि कानपूर धोक्याच्या पातळीजवळ आले आहे.