ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 9 - एका फेसबूक पोस्टमुळे पश्चिम बंगालमधील 24 परगणा जिल्हयात दोन गटात जातीय दंगल उसळली होती. या पार्श्वभूमीवर शनिवारी भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी जंतर-मंतर मैदानावर निषेध आंदोलनाचे आयोजन केले होते. यावेळी कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्यांनी नवा प्रताप केल्याचे समोर आले आहे. कार्यकर्त्यांना ट्विटरद्वारे आवाहन करताना 2002 मध्ये गुजरातमध्ये भडकलेल्या दंगलींच्या फोटोचा वापर केला आहे. या प्रकारामुळे नुपूर शर्मा अडचणीत येण्याची शक्यता आहेत. 2014 मध्ये नुपूर शर्मा केजरीवाल विरोधात निवडणूकित उभ्या होत्या. नुपूर शर्माच्या या प्रतापामुळे राजकीय वातावरण गरम होण्याची शक्यता आहे. नुपूर शर्मा यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये जमाव काही वाहनांची जाळपोळ करत असतानाचा आहे. त्यांच्या या पोस्टनंतर नेटीझन्सनी त्यांचा चांगलाच समाचर घेत त्यांना ट्रोल केलं आहे. यावेळी नेटिझन्सनी त्यांना हा फोटो पश्चिम बंगालमधील झालेल्या दंगलीतील नसून ते 2002 मधील गुजरात दंगलीचे असल्याची आठवण करून दिली. पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी सोशल मीडियावरुन बनावट छायाचित्र व्हायरल करणाऱ्या व्यक्तीला कोलकाता पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.
आणखी वाचा -
Speak-up because it is already too late! Join in at 5 PM today at Jantar Mantar #SaveBengal#SaveHinduspic.twitter.com/QU5ZT1HkUt— Nupur Sharma (@NupurSharmaBJP) July 8, 2017