नाशिक : पश्चिम बंगालमधील बांकूरा जिल्ातील भगवान विष्णूच्या नावावरून स्थापित झालेले बिष्णूपुरा हे गाव़ या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे जुनी तटबंदी आणि टेराकोटाने बांधलेली आकर्षक अशी तीस मंदिरे अन् शिल्पाकृती़ वास्तुकला, संगीत व हस्तकलेचे प्रतीक असलेल्या या मंदिरांची अनुभूती नाशिककरांना छायाचित्रांच्या माध्यमांतून हार्मनी आर्ट गॅलरीत बघता येणार आहे़ आर्किटेक्ट संजय पाटील यांनी काढलेल्या या मंदिरांची छायाचित्रांचे प्रदर्शन शुक्रवार (दि़ ५) पासून सुरू झाले आहे़मुंबई येथील प्रसिद्ध छायाचित्रकार व वास्तुविशारद यशवंत पिटकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले़ गुप्त काळातील इतिहास असलेले बिष्णूपूर हे हिंदू व मल्ल राजाच्या राजधानी अंतर्गत होते़ मल्ल राजा हा विष्णूचा अनुयायी असल्याने भगवान विष्णूचा अवतार असलेले श्रीकृष्ण, राधा यांची या मंदिरांमध्ये पूजा केली जाते़ उत्कृष्ट कारागिरांची कला दर्शविणारी मंदिराची वास्तुकला ही बंगाल टेराकोटा कलेच्या शास्त्रीय शैलीचे उत्तम उदाहरण असल्याचे पाटील यांनी सांगितले़या प्रदर्शनामध्ये बिष्णूपुरामधील जुने वीटकाम असलेले रासमंच मंदिर, एकरत्न शैलीतील राधेश्याम मंदिर, पंच सुळके असलेले श्यामराई मंदिर, कृष्णलीलेची दृश्य अलंकृत पद्धतीने कोरलेले जोर बंगला मंदिर यांचे अप्रतिम फोटो आहेत़ या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी वास्तुविशारद दीपक देवरे, चित्रकार राजेश सावंत उपस्थित होते़ दि. ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे़ (प्रतिनिधी)फोटो :- ०५पीएचएफबी ८०हार्मनी आर्ट गॅलरीमध्ये सुरू झालेल्या बिष्णूपुरामधील टेराकोटा मंदिर छायाचित्र प्रदर्शनात छायाचित्रांबाबत माहिती देताना आर्किटेक्ट संजय पाटील़फोटो :- ०५पीएचएफबी ७४ ते ७७ व ७९बिष्णूपुरामधील टेराकोटा मंदिरे़
बिष्णूपुरामधील टेराकोटा मंदिरांच्या छायाचित्रांची रसिकांना भुरळ
By admin | Published: February 05, 2016 11:58 PM