चेन्नई : चांद्रयान-२ च्या आॅर्बिटरवर बसवण्यात आलेल्या आॅर्बिटर हाय रिझोल्यूशन कॅमेऱ्याने (ओएचआरसी) चंद्राच्या पृष्ठभागाची टिपलेली छायाचित्रे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उपलब्ध केली आहेत.इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ही छायाचित्रे आॅर्बिटरकडून पाच सप्टेंबर २०१९ रोजी भारतीय प्रमाण वेळ ४.३० वाजता मिळाली. चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलोमीटर उंचीवर ही छायाचित्रे घेतलीगेली. या छायाचित्रांत बोग्युस्लावस्की ई. क्रेटरचे (विवर) काही भाग टिपले गेले आहेत. या विवराचा व्यास १४ किलोमीटर व खोली तीन किलोमीटर असून हे विवर चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात आहे. या छायाचित्रांत चंद्रावर पाण्याने किंवा हवेने घासून वाटोळे झालेले मोठे खडक असल्याचे दाखवले आहेत, असे इस्रोने म्हटले.
ऑर्बिटरने पाठवली चंद्रावरील छायाचित्रे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 00:30 IST