नवी दिल्ली: कोरोना संकट काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारनं अनेक योजना आणल्या. आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या माध्यमातून सरकारकडून महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. यानंतर आता एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मेसेज 'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'शी संबंधित आहे.'प्रधानमंत्री कन्या विवाह योजने'च्या माध्यमातून सरकार मुलींच्या लग्नासाठी ४० हजार रुपये देणार असल्याचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र हा मेसेज खोटा असल्याची माहिती पुढे आली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे. सरकार मुलींच्या लग्नासाठी पैसे बँक खात्यात जमा करत नसल्याचं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. सध्या सरकारची अशी कोणतीही योजना नसल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे.
Fact Check : मुलीच्या लग्नासाठी मोदी सरकार देतंय ४० हजार रुपये; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं सत्य
By कुणाल गवाणकर | Updated: January 27, 2021 14:17 IST