कोरोनामुळे कितीतरी गोष्टी बदलत आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळलं जात आहे. लॉकडाउनमुळे अनेक लोकांनी घरातच केस कापणे सुरू केले होते. इतकेच काय लोकांना सोशल मीडियावर फोटोही शेअर केले होते. आता एक फोटो हरयाणातून व्हायरल झालाय. यात एक न्हावी चक्क पीपीई कीट घालून केस कापत आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा फोटो हरयाणाच्या पंचकूलातील आहे. त्यांनी माहिती दिली आहे की, दोन भावांनी रस्त्याच्या कडेला झाडाखाली सलूनचं दुकान सुरू केलंय. यातील एकाने सांगितले की, हे दुकान आम्ही 20 वर्षांपासून चालवत आहोत. आम्ही पीपीई स्वत:ची आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी घातलं आहे'.
या फोटोंमध्ये तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे दोन्ही भाऊ पीपीई कीट घालून ग्राहकांचे केस कापत आहेत. लोकांनी सुद्धा यासाठी दोन्ही भावांचं कौतुक केलंय. तर काही लोकांना यावर प्रश्नही उपस्थित केले आहेत.
आतापर्यंत हरयाणामध्ये 1, 381 कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. कदाचित येत्या काळात न्हावी अशाच रूपात आपल्याला बघायला मिळतील. तसेच लोकांना रोजगार मिळण्यासाठीही हा एक चांगला मार्ग आहे.