अहमदाबाद - विमानात कबुतर शिरल्याची घटना समोर आली आहे. अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या गो एअरच्या विमानात कबुतर शिरल्याने गोंधळ झाला. कबुतर पाहून प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. विमान धावपट्टीवरून उड्डाण घेण्याआधी हा संपूर्ण प्रकार घडल्याने गोंधळ निर्माण झाला होता. तर काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये उडणाऱ्या कबुतराचा व्हिडिओ शूट केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद एअरपोर्टवर गो एअरचे जी 8-702 विमान टेक ऑफ करण्याच्या तयारीत होते. सर्व प्रवासी बसल्यानंतर विमानाचा दरवाजा बंद करण्यात आला होता. एका प्रवाशाने आपली बॅग ठेवण्यासाठी विमानातील सामनाचे शेल्फ उघडले तर त्यातून चक्क कबुतर बाहेर आले. विमानात कबुतर आलेलं पाहून सर्वच प्रवासी आश्चर्यचकित झाले. शेल्फमधून बाहेर आल्यावर ते उडू लागले. हा प्रकार पाहताच प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला.
विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना शांत केले. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी त्वरीत हा प्रकार ग्राऊंड स्टाफला सांगितला. यानंतर विमानाचा दरवाजा उघडला गेला. शुक्रवारी संध्याकाळी अहमदाबादवरुन जयपूर आलेल्या विमानात हा सर्व प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे विमान जवळपास जयपूर विमानतळावर अर्धातास उशिरा उतरले. संध्याकाळी 6.15 वाजता हे विमान जयपूरला पोहोचण्याची वेळ होती. मात्र त्या ऐवजी विमान अर्धा तास उशीरा म्हणजेच 6.45 वाजता विमानतळावर उतरले.
महत्त्वाच्या बातम्या
Facebook, Google ही पाकिस्तानला कंटाळले, दिला 'हा' इशारा
Breaking : सस्पेन्स सुटला, मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती
...तर दिल्ली सरकारलाही देशद्रोहाचा कायदा समजला नाही : चिदंबरम
Delhi Voilence : दिल्ली हिंसाचारात 42 जणांचा मृत्यू, 630 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
आजच उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मार्च महिन्यात 19 दिवस बँक बंद